Posts

आयुष्याचा काटा

अरे जरा थांब... अरे! अरे! थांब अरे!  आई ग! पडलो!  आरे!  बाबा तुला थांब म्हणलं  होत ना...बघ बरे तुला पण दुखापत झाली आणि तु मला पण रागावन फेकून दिले ... मी तरी काय करू   निसर्गाने मला बनवलच आहे सगळ्या च्या आयुष्यातला काटा .        आरे तुम्ही सगळेजण त्या फुलांकडे  किती आकर्षत असता मला तर  त्यांचा हेवाच वाटतो.  माणसाच्य आयुष्यात पण  असचं असत बर का! माझ्या सारखा जर तु पण  आयुष्यातला काटा  बनला तर तुला पण कोणी जवळ नाही करायच...आणि जर फुल बनला तर सगळेच जवळ करतील.तो ओढा दिसतोय का? किती नितळ पाणी आहेना  त्याच. त्याच्या पलीकडे काठावर माझ घर होतं.  आणि तो खविस मालक आइतवारी आला आणि माझ्या घराचे पुरते तुकडे पाडले रे! माझी सगळी भावंडे विलग झाली... काही त्या मालकाने फांद्या सोबत नेले. काही ओढयासोबत वाहुन गेले आणि मी तर खुपच दूर वाऱ्याची झुळूके सोबत उडत आलो. त्या दिवशी एका अनवाणी पादचाऱ्या च्या पायात काटा मोडला आणि मी कामाला आलो मला तर  अप्रूप वाटलं माझ.  आणि म्हणतात ना प्रत्येकामध्ये काही ना काही गुण अव...

लिली एल्बे

Image
(चुकीच्या उच्चार-बोली टाळण्यासाठी पात्राची नावे English भाषेत अनुवाद केला आहे.)  लिंग परिवर्तन शस्त्रक्रिया  करण्यारया व्यक्ती मध्ये लवकरच क्रमांक लावणारी महिला/पुरुष अशी ओळख असणारी Lili Elbe (Einar Wegener) च्या आयुष्यात डोकावताना आपल्याला त्याच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी  धडपड आणि यापेक्षा त्याचा पत्नीचे (Gerda Wegener) सगळे आयुष्य पणाला लावून Lili Elbe (Einar Wegener) ला दिली ती साथ  हदयाला लागून जाते.  _________________________________  Copyright free image.  ********लिली एल्बे******** 28 December 1882 ला Einar चा Vejle, Denmark येथे जन्म झाला . लहानपणापासून portrait  चित्रकलेची आवड होती त्याला , तो एक नावाजलेला चित्रकार होता.   1904 मध्ये Einar चे Gerdaशी लग्न झाले, Gerda पण एक चित्रकार होती, पण ती त्यात नाव मिळवायला धडपडत होती.  सगळ काही ठीक चालू होते  आणि Gerdaची  धडपड ही चालूच होती.  कायम कायम तिला कामात निराशा मिळायची आणि तिला अजून चांगली paintings बनवायला सांगितले जायचे खूप सुंदर अश्या चित्रांनाही नका...

हरवलेले मन

कस्तुरी मृगा गत  मन वागले का आज, सुख उरात लपवून जगभर फिरते का आज | भर उन्हात चालणारी अनवाणी पाऊली ती, आणि आता ,सावलीलाही त्याची दया यावी | मन फुलपाखरू का  झाले आज, चौकटीची त्याला गरज पडावी |                                         नको ते आभासी क्षितिज , जवळ जाता तोंड फिरवते |                                                 बघ ,ती पणती ही तुला वाट दाखवते |   उरातल्या कस्तूरीशी ओळख करून दे मनाला  दिवस हा परत नाही |                            फु लपाखरे झेप घेती, फुले ती सदैव नाही | कठोर बनविन पाऊले मी,प्रखरता सुर्याची कमी पडावी | मोह नको क्षितिजाचा,  अंधारातही वाट दिसावी|             -पुजा मेहेत्रे...