हरवलेले मन
कस्तुरी मृगा गत मन वागले का आज, सुख उरात लपवून जगभर फिरते का आज | भर उन्हात चालणारी अनवाणी पाऊली ती, आणि आता ,सावलीलाही त्याची दया यावी | मन फुलपाखरू का झाले आज, चौकटीची त्याला गरज पडावी | नको ते आभासी क्षितिज , जवळ जाता तोंड फिरवते | बघ ,ती पणती ही तुला वाट दाखवते | उरातल्या कस्तूरीशी ओळख करून दे मनाला दिवस हा परत नाही | फु लपाखरे झेप घेती, फुले ती सदैव नाही | कठोर बनविन पाऊले मी,प्रखरता सुर्याची कमी पडावी | मोह नको क्षितिजाचा, अंधारातही वाट दिसावी| -पुजा मेहेत्रे...