आयुष्याचा काटा
अरे! अरे! थांब अरे!
आई ग! पडलो!
आरे! बाबा तुला थांब म्हणलं होत ना...बघ बरे तुला पण दुखापत झाली आणि तु मला पण रागावन फेकून दिले ... मी तरी काय करू निसर्गाने मला बनवलच आहे सगळ्या च्या आयुष्यातला काटा .
आरे तुम्ही सगळेजण त्या फुलांकडे किती आकर्षत असता मला तर त्यांचा हेवाच वाटतो. माणसाच्य आयुष्यात पण असचं असत बर का! माझ्या सारखा जर तु पण आयुष्यातला काटा बनला तर तुला पण कोणी जवळ नाही करायच...आणि जर फुल बनला तर सगळेच जवळ करतील.तो ओढा दिसतोय का? किती नितळ पाणी आहेना त्याच. त्याच्या पलीकडे काठावर माझ घर होतं. आणि तो खविस मालक आइतवारी आला आणि माझ्या घराचे पुरते तुकडे पाडले रे! माझी सगळी भावंडे विलग झाली... काही त्या मालकाने फांद्या सोबत नेले. काही ओढयासोबत वाहुन गेले आणि मी तर खुपच दूर वाऱ्याची झुळूके सोबत उडत आलो. त्या दिवशी एका अनवाणी पादचाऱ्या च्या पायात काटा मोडला आणि मी कामाला आलो मला तर अप्रूप वाटलं माझ. आणि म्हणतात ना प्रत्येकामध्ये काही ना काही गुण अवगुण असतात त्या अवगुणामुळे नाइलाजाने आज तुला पण दुखापत केली.
आरे तु तर पुन्हा आला बाबा आता तरि पाहून चाल .. अरे थांब! ...
तुला परत लागलं..माफ कर रे आता मला. आरे तु मला तोडतो का आहेस? नको रे.. अरे! अरे!..
ट् ठ् ड् ढ् ण्...
-पुजा मेहेत्रे...
Comments
Post a Comment