हरवलेले मन
कस्तुरी मृगा गत मन वागले का आज,
सुख उरात लपवून जगभर फिरते का आज |
भर उन्हात चालणारी अनवाणी पाऊली ती,
आणि आता ,सावलीलाही त्याची दया यावी |
मन फुलपाखरू का झाले आज, चौकटीची त्याला गरज पडावी |
नको ते आभासी क्षितिज , जवळ जाता तोंड फिरवते | बघ ,ती पणती ही तुला वाट दाखवते |
उरातल्या कस्तूरीशी ओळख करून दे मनाला दिवस हा परत नाही | फुलपाखरे झेप घेती, फुले ती सदैव नाही |
कठोर बनविन पाऊले मी,प्रखरता सुर्याची कमी पडावी |
मोह नको क्षितिजाचा, अंधारातही वाट दिसावी|
-पुजा मेहेत्रे...
✌
ReplyDelete