लिली एल्बे
(चुकीच्या उच्चार-बोली टाळण्यासाठी पात्राची नावे English भाषेत अनुवाद केला आहे.)
लिंग परिवर्तन शस्त्रक्रिया करण्यारया व्यक्ती मध्ये लवकरच क्रमांक लावणारी महिला/पुरुष अशी ओळख असणारी Lili Elbe (Einar Wegener) च्या आयुष्यात डोकावताना आपल्याला त्याच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी धडपड आणि यापेक्षा त्याचा पत्नीचे (Gerda Wegener) सगळे आयुष्य पणाला लावून Lili Elbe (Einar Wegener) ला दिली ती साथ हदयाला लागून जाते.
_________________________________
********लिली एल्बे********
28 December 1882 ला Einar चा Vejle, Denmark येथे जन्म झाला . लहानपणापासून portrait चित्रकलेची आवड होती त्याला , तो एक नावाजलेला चित्रकार होता.
1904 मध्ये Einar चे Gerdaशी लग्न झाले, Gerda पण एक चित्रकार होती, पण ती त्यात नाव मिळवायला धडपडत होती.
सगळ काही ठीक चालू होते आणि Gerdaची धडपड ही चालूच होती.
कायम कायम तिला कामात निराशा मिळायची आणि तिला अजून चांगली paintings बनवायला सांगितले जायचे
खूप सुंदर अश्या चित्रांनाही नकार दिल्याने Gerda ने Ulla Poulsen नावाच्या एका नर्तकीची painting करायचे ठरवले.
Ulla ठरलेल्या दिवशी वेळेत आली नाही तर Gerda ने तिच्या पतीला (Einar) Ulla चे कपडे घालून pose दयायला विनंती केली आधी तर Einar ने नकार दिला पण तिच्या हट्टा साठी त्याने ते बायकी कपडे घातले आणि इथेच त्याला त्याच्या अस्तित्वाची जाणिव झाली . त्याला हे कपडे घालून खूपच आनंद झाला होता. Einer चे हावभाव, त्याचे बोल, चाल , poses यासगळ्या मध्ये एक बायकी पणा होता.
Einer पुरता आपल्या रुपात गुंतलेला होता.
Gerda Einer चे खूप सारे आकर्षक आणि मादक असे चित्र रेखाटते. ते चित्र पाहून कोणालाही वाटणे अशक्य होते की ती आकर्षण मुलगी Einer आहे. Gerda ने ते चित्र जेव्हा प्रदर्शित केले तेव्हा चित्रातील मुलीला (model of painting) भेटावयास सांगितले . त्यासाठी Gerda ने Einer ला मुलगी बनवले आणि रंगरंगोटी करून त्याची Einer ची बहीण Lili अशी ओळख करून दिली. आता जगासाठी Lili ही Einer ची बहिण होती पण Einer या सगळ्यात गुंतला होता. त्याचे मन आता पुरुषांकडे आकर्षित होत असे . त्याला आपले बाहेरील शरीर रचना जरी षुरुषाची असली तरी मन आणि आतील रचना ही स्त्रीची असल्याची जाणीव झाली होती . Einer ला आता लक्षात आले होते की प्रत्येक महिण्यात त्याला पोट दुखण्यामुळ त्रास होत असे त्याचे कारण हे मासिक पाळी मुळे होत असे, त्याला त्याची जाणीव होत असे पण इतकी नाही की त्याने आपण आतून एक स्त्री आहे हे स्वीकारावे. आता त्याने ते मान्य केले आणि राहिलेले आयुष्य त्याला एक स्त्री (Lili) म्हणून जगायचे होते , पण या सगळ्या गोष्टी मध्ये Gerda ने तिचे जसे सगळे काही गमावले होते. याबाबत ती Lili शी बोलली तेव्हा तिने आपल्यात होणारे बदल आणि आपले अस्तित्व Gerda ला सांगितले.Einerला आता Lili म्हणून जगायचे आहे हे देखिल त्याने Gerda ला सांगितले. Gerda ने त्याला Doctor कडे जायला हवे असे बोलून त्याला Doctorकडे घेऊन गेली. परंतु सर्व Doctorने Einer ची मानसिक स्थिती योग्य नाही हा सल्ला दिला कुणीही त्याचा विश्वास करत नसे, पण Gerdaला तिच्या वैवाहिक जीवनातील काही क्षणांमुळे तीला Einer वर विश्वास होता.सगळया काही ठिकाणी प्रयत्न केल्यानंतर 1931 साली Dr. Erwin Gohrbandt यांनी sexologist Magnus Hirschfeld यांच्या मार्गदर्शनाखाली Berlin येथे Einer च्या शस्त्रक्रियेची पहिली पायरी पूर्ण केली.
13 September 1931 ला दुसऱ्या शस्त्रक्रियेदरम्यान Lili(Einer) चे शरीर झालेले बदल स्वीकारू शकले नाही आणि त्याने आपल्या अस्तित्वाचा अयशस्वी शोध घेताना शेवटचा श्वास घेतला.
Lili च्या मुत्यु नंतर Gerda ने Fernando Porta(1931–1936) याच्याशी लग्न केले,पण ते खूप काळ टिकू शकले नाही.Fernando Portaने Gerda च्या संपत्ती वर जीवन जगून 28 July 1940 ला Gerda दारिद्र्य अवस्थेत मरण पावली.
आजही German Contries मध्ये आणि जगभरात Lili ची अस्तित्वाच्या शोधाची धडपड समाजाला प्रेरित करते, समाजाची लाज न बाळगता आपला शोध घ्यायला भाग पाडते.
2015 मध्ये Lili आणि Gerda च्या संघर्षाला जगासमोर आणण्यासाठी The Danish Girl हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
-पुजा मेहेत्रे...
Great 👍
ReplyDeleteGreat 👍
ReplyDelete✌☺
ReplyDelete